Transform Your Future with Commerce Education at Success Commerce Academy
दैनिक विधानमित्र - Thane पृष्ठ : ४ प्रत्येक शिक्षकाने अली अकबर मियागामवाला सर यांचे आदर्श घेणे आवश्यक ! - दत्तात्रय डायरे (उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता) बदलापूर, दि. ५/ प्रतिनिधी :- अलिअकबर मियागामवाला यांनी पन्ना कॉलेजमध्ये जवळ जवळ दोन दशके, एक प्रामाणिक शिक्षक म्हणून कार्य केले आहे आणि त्यातून हजारो विध्यार्थी जीवनात पुढे गेले असे मत दत्तात्रय डायरे यांनी व्यक्त केले. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झालाआणि त्यानिमित्ताने दैनिक विधानमित्र या वृत्तपत्राशी बोलताना डायरे पुढे म्हणाले बदलापूर शहरात शिक्षकांनीच आजच्या राजकारणी लोकांना घडवले आहे, त्यात डायरे यांनी उदाहरण दिले ते पुढील प्रमाणे पवार विद्यालयाचे माजी प्रोफेसर अली सर आणि त्यांची बहीण फरीदा खोपोलीवाला याही बदलापुरात गेल्या दिसून अधिक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात आपले अमुलाग्र योगदान देत आहेत. गेली पाच वर्षे त्या भारत कॉलेजच्या प्राचार्य पदाची यशस्वी धुरा सांभाळत आहेत. अली सर आणि फरीदा खोपोलीवाला यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदान यामुळे त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थीनीं यशाला गवसणी घातली आहे. ? विद्यार्थी हे फरिदा खोपोलीवाला यांच्या कार्याचे नेहमीच आदराने कौतुक करतात. मुख्याध्यापक रमेश जाधव सर, आदर्श विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापक रमेश बुटेरे सर तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर. अलिअकबर सर यांनी आपल्या मेहनतीने युवासेना म्हणजेच भारतीय विध्यार्थी सेना अनेक वर्षे शहरप्रमुख म्हणून सांभाळली आणि त्याच वेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली होती असेही पुढे डायरे म्हणाले. डायरे पुढे म्हणाले अलिअकबर सर फक्त शिक्षक म्हणूनच नाही तर एका पालका प्रमाणे तसेच कधीकधी मित्राच्या भूमिकेत येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रश्न सोडवले.
NEWSPAPER
दत्तात्रय डायरे (उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता)
4/1/20251 min read


Udyogmitra Date: 5th
Success Commerce Academy
Since: year 2000
Quality education for Commerce Education
Call
Enroll Today...refer Someone!
© 2025 SUCCESS COMMERCE ACADEMY All rights reserved.
Design: Shalom Arts and Webs
Branch
Basement Mohini Apartments, Katrap Chawk, Badlapur (E)
2nd Floor, C/O. J.C. Classes, Devdhar Market, Badlapur(W)
Email id
Links
